जगलो ते मनासारखच
जन्माला आलो ते दुसऱ्यांच्या कारणांसाठी,
पण जगलो ते स्वतःच्याच कारणांसाठी.
पण जगलो ते स्वतःच्याच कारणांसाठी.
सूर्य म्हणुन प्रकाशित झालोही असतो,
पण आतले स्फोट आपल्याला सोसले नसते.
चंद्रा सारखा शीतल झालोही असतो,
पण प्रकाशासाठी परावलंबन आपल्याला शोभले नसते.
जगलो बऱ्याचदा दिलदार होवुन तर कधी स्वार्थी होवुन,
थोडसं त्यांच्या मनासारख आणि बरचस्ं माझ्याच मनासारखं.
मी बरोबर की चुकीचा जगलो हे ठरवणार कोण,
प्रत्येकाचे कारण वेगळे माझे विचारणार कोण.
कधी शुक्रवारी जगताना शनिवारचा विचार केलाही,
तर रविवारी जगताना कधी सोमवारची तयारी केलीही.
गटांगळ्या खाताना कधी काडीचा आधार घेतलाही,
तर स्वतःहुन बुडताना समुद्राने किनारी लोटलेही.
सही म्हणुन केल्या ज्या गोष्टी आणि पुढे कुठे पडलोही,
केल्या त्या हजार चुका आणि कधी कुठे घडलोही.
कधी खेळलो, कधी हसलो आणि कधी कुठे भिडलोही,
कधी पळालो, प्रेमात पडलो आणि थोडे रडलोही.
कधी हसताना डोळ्यांत् पाणी आलेही होत,
तर कधी डोळ्यांत पाणी असताना हसललोही
कधी स्वतःसाठी दुसऱ्यांशी भांडलोही होतो,
तर कधी भांडलो होतो स्वतःशीच त्यांचासाठीही.
जगलो ते मनासारखे स्वतःचेच निर्णय पेलवत,
निसर्गाकडे बघत आणि धुरकांडीला नाक लावतच.
जगलो ते मनासारखच्, बरंचसं स्वतःसाठी पण थोडं दुसऱ्यासाठीही.
जगलो ते मनासारखच्, कधी स्वतःतच डोकावत तर कधी आकाशाकडे बघतही.
जळलो आहे सरणावर जरी मी, धूर होऊन जातो श्वासात कुणाच्या तरी,
झाली आहे राख माझी तरी पायाखाली येते ती कुणाच्या तरी.
कर्माचं गणित जरी शुन्य झालं पण देणं घेणं हे चालूच आहे,
माझ्या काट्याशी बोलतात ते आणि पावसाळ्यातही पाणी चालुच आहे.
आता हे झाड वाढतंय माझ्यावरती भांडतय प्रकाशासाठी,
मुळे ही अजुन मनासारखीच; स्वैर, खोल आणि गुंतलेली.
फरक इतकाच की आता कुणी घाव घातले तर त्रास होत नाही,
कारण जमिनीशी नातं इतकं घट्ट आहे की कोणी तोडु शकत नाही.


